• आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

 

 • एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

 

 • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

 

 

 • सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

 

 • स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

 

 • आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

 

 • जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.

 

 • माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,
  काही फांदी सारखी,
  जास्त जोर दिला कि तुटणारी..

 

 • कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.

 

 • साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…

 

 • भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.

 

 • जेंव्हा सगळंच संपून गेलंय
  असं आपल्याला वाटतं,
  तीच खरी वेळ असते
  नवीन काहीतरी
  सुरु होण्याची..!

 

 • तुमचा आजचा संघर्ष
  तुमचे उद्याचे सामर्थ्य
  निर्माण करतो
 • स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
  कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
  आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
  करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.

 

 • प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,
  कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.